Good News2 पैकी 4

Invitation to Know Jesus Personally

A narrator gives an invitation to know God personally. The invitation is open to everyone. It means turning to God and trusting Jesus with our lives and to forgive our sins. We can speak to Him in prayer when we're ready to become followers of Jesus.

तुमचा प्रश्न विचारा

बायबलमधील उद्धरणे

शेअर करा
मोफत संसाधने

बायबल अधिक सखोल समजून घ्यायचे आहे का?

आमच्या बायबल अभ्यासात सहभागी व्हा

प्रतिलेख

Marathi (मराठी)
फार आधी संदेष्ट्यांनी वचनांत लिहिलं होतं. की परमेश्वर पापी लोकांना वाचवण्यासाठी मसिहाला पाठवील आणि त्याचं समेट आपल्या सोबत करील. येशूचं जीवन हे दाखवतं की हा तारणारा आहे. यशयाच्या संदेष्ट्या लिहितो कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि ते घडलं. परमेश्वराचं सामर्थ्य मर्य्यावर येऊन कुमारी असतानाही ती गर्भवती झाली आणि तिनं येशूला जन्म दिला. जसं की हे वचनात लिहिलेलं आहे हा चमत्कार आहे. त्याचा जन्म हे देवाचं चिन्ह आहे की हा पुत्र मसिहा आहे ज्याला देवानं आपल्या पुत्र असं म्हटलं. जेव्हा लोकांनी येशूला पाहिलं त्यानं देवाचं सामर्थ्य आणि स्वभाव पाहिला. त्यानं लोकांना आरोग्य दिलं आणि त्याच्या पापाची क्षमा केली. आणि त्यानं त्यांना अनंतकाळच्या राज्याचा अभिवचन दिलं. येशूनं आपल्या प्राणांचं बलिदान केलं आणि सर्व मानवजातीकरिता शिक्षा भोगली. नंतर तो परत जिवंत झाला आणि हे दाखवून दिलं की त्याचं सामर्थ्य हे मृत्यूच्या सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. येशू ख्रिस्तानं म्हटलं माझ्याकडे जीवन देण्याचं आणि ते परत घेण्याचं सामर्थ्य आहे. ज्या प्रकारे संदेश त्यांनी लिहिला होता की मसिहाचा जीवन कशा प्रकारचा असेल, त्याचं जीवन तसंच होतं. येशूचं जीवन ह्याची खात्री देतं की देवाचं पवित्र वचन हे सत्य आणि न बदलणारं आहे. खरंच येशू हा देवाचं वचन होता. येशूद्वारे देवाने स्वतःहाच या जगातील लोकांना प्रकट केलं. प्रारंभी परमेश्वरानं पुरुष आणि स्त्रीची रचना केली, जेणेकरून ते त्याच्या उपस्थितीत आरामदायक राहावेत. परंतु त्यांनी परमेश्वरावर अविश्वास दाखविला आणि त्यांनी त्याच्या आज्ञा मोडली. वचनात हे लिहिलं आहे की सर्व मानवजातीनं पाप केलं आहे आणि पापांचा परिणाम मृत्यू आहे. ज्या लोकांनी पाप केलं ते देवासोबत राहू शकत नाहीत. ज्या प्रकारे परमेश्वरानं अब्राहमाच्या मुलाऐवजी एळका मरण्यास पुरविला, त्याप्रकारे परमेश्वरानं आदामाच्या वंशाच्या ऐवजी येशूला मरण्यास पाठवलं. हे त्यांनी अशासाठी केलं की जो कोणी येशूवर विश्वास आणि भरवसा ठेवील तो परमेश्वराच्या उपस्थितीत येईल. म्हणून जो कोणी येशूच्या मागे चालेल तो शिक्षेपासून वाचविला जाईल आणि परमेश्वरासोबत सदा सर्वकाळ राहील. जेव्हा येशू मृतांतून जिवंत झाला, आपल्या मागे चालणाऱ्यांना त्यानं म्हटलं, लोक माझं नाव सर्व राष्ट्रात जाहीर करतील, जेणेकरून जो पश्चात्ताप करील आणि माझ्याकडे येईल परमेश्वर त्याच्या पापांची क्षमा करील. येशूनं हे देखील म्हटलं की तो पवित्र आत्मा पाठवेल जो त्याच्या मागे चालणाऱ्यांसोबत राहील जो त्यांना सत्य दाखवील आणि परमेश्वराच्या मार्गावर चालण्याकरिता सामर्थ्य देईल. जेव्हा पापी स्त्रीनं आपल्या पापांचा पश्चात्ताप केला आणि येशूच्या मागे चालू लागली येशूनं तिला म्हटलं, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तुझ्या विश्वासाने तुला वाचवलं आहे." येशू ख्रिस्तानं लोकांना आपल्या मागे चालण्यास सांगितलं. ज्यांनी येशूच्या मागे चालण्याचा निर्णय घेतला आहे ते या शब्दांनी या नात्याची सुरुवात करू शकतात. पित्या परमेश्वरा, तू नीतिमानआहेस. मी तुझे आभार मानतो की तू माझ्यावर प्रीती करतोस. मला खेद वाटतो की तुझ्या आज्ञा मी मोडल्या आणि तुझ्याविरुद्ध पाप केलं. मी तुझे आभार मानतो की माझ्या ऐवजी तू येशूला मरण्यासाठी पाठवला आणि तो मृतातून जिवंत झाला. मी तुझे आभार मानतो की जे पाप मी केलं होतं त्याची शिक्षा येशूनं स्वतःवर घेतली. आणि माझा प्रभू म्हणून स्वीकारतो. मी तुझे आभार मानतो की तू माझ्या पापांची क्षमा केलीस. आणि मला तुझ्यासोबत राहण्याकरिता तुझ्या राज्यात मार्ग उघडे केलेस. मी तुला विनंती करतो तुझ्या पवित्र आत्म्याकरिता जो माझ्यासोबत राहील आणि मला तुझा मार्ग दाखवेल. तू मला सामर्थ्य देशील की मी तुला संपूर्ण अंतःकरणानं प्रीती करावी आणि तुला आवडणारा जीवन मी जगावं आणि जगात लोकांन प्रत्येक ठिकाणी तूची स्तुती करावी. आमेन. येशूनं आपल्या मागे चालणाऱ्यांना म्हटलं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. येशूच्या मागे चालणारे एकत्र भेटले, ते त्याच्या सोबत रोज बोलले, ते वचनात त्याच्या शब्दांचा अभ्यास करू लागले. त्याच्या प्रमाणे चालण्यास ते शिकत आणि त्याच्या बद्दल ते इतरांना सांगत असत. येशू त्यांना पवित्र आत्म्याने जो त्यांच्या अंतःकरणात राहात असेल त्याद्वारे मार्गदर्शन आणि सामर्थ्य देत असे. आपल्या सिंहासनाकडे जे स्वर्गात होते तिथे जात असताना येशून त्यांना काय म्हटलं ते त्यांनी ध्यानात ठेवलं. परमेश्वराने स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.
JesusFilm