परमेश्वर हा महान आहे, त्याच्या सामर्थ्य सर्वांहून अधिक आहे.
त्यानं आकाश आणि पृथ्वी आणि त्यामधील सर्व बनवलं.
परमेश्वरानं जे काही बनवलं तेच पाहतो तर ते सर्व अद्भुत आहे.
परमेश्वरानं जे काही बनवलं ते सर्व चांगलं होतं.
ते सर्व त्याची महानता, चांगुलपणा आणि सामर्थ्य प्रगट करतं.
परमेश्वरानं वेगवेगळ्या प्रकारची झाडं निर्माण केली आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी.
मग परमेश्वरानं मातीचा मनुष्य घडविला,
त्याच्या नाकपुड्यातजीवनाचा श्वास फुंकला आणि त्याला जीवन दिलं.
पहिल्या मनुष्याला आदाम असं म्हटलं.
मग परमेश्वराने आदामाची एक फासळी काढली आणि त्यापासून स्त्री बनवली
जी आदामाची पत्नी आणि सहचरिणी बनली.
तिला हव्वा असं म्हटलं.
परमेश्वराने पुरुष आणि स्त्रीला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं,
जेणेकरून ते त्याच्याशी अतिशय जवळचे संबंध स्थापित करू शकतील.
-ते त्याच्या उपस्थितीत त्या बागेत आनंदात राहात होते.
त्या बागेस ईदेन असं म्हटलं.
तिथे कोणतंच दुःख किंवा मृत्यू नव्हता.
परमेश्वराने आदामाला म्हटलं, तू सर्व झाडांची फळं खाऊ शकतोस,
पण एका झाडाचं नाही. जर तू त्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील.
परंतु एक दिवस सैतानाला हव्वेस भरवळ बाडली.
तेव्हा तिनं त्याचं फळ काढून खाल्लं.
आणि आपल्याबरोबर आपल्या पतिसहीत दिलं.
त्याने परमेश्वरावर विश्वास न ठेवता सैतानावर विश्वास ठेवला.
त्याक्षणी त्यांचा परमेश्वरासोबतचा संबंध तुटला,
कारण परमेश्वर पवित्र आहे.
-आणि पापी व्यक्ती त्याच्या उपस्थितीत राहू शकत नाही.
म्हणून देवाने आदाम आणि हव्वाला ईदेन बागेतून बाहेर काढलं.
त्यांना ही लज्जा सहन करावी लागली कारण त्यांनी देवाची आज्ञा मोडली होती.
परिणामस्वरूप आदाम आणि हव्वा आणि त्यांचे सारे वंशज
यांना दुःख आणि मृत्यू सहन करावा लागला.
परमेश्वर अत्यंत दयाळू आहे, तो निरंतर मानवजातीवर प्रीती करीत राहिला.
त्याने आधीच त्यांच्यासाठी परत येण्याकरिता आणि त्याच्यासाठी सहभागिता ठेवण्याकरिता मार्ग तयार केला.
वचनामध्ये परमेश्वरानं मानवाचं पात, लज्जा
आणि त्याच्यावरील दंड कायमस्वरूपी दूर करण्याची योजना प्रकट केली.
देवानं आपल्या योजनेतील भाग अब्राहाम संदेश त्याला प्रकट केला.
आब्राहामाने परमेश्वरावर भरवसा ठेवला
आणि त्याचा आदर केला.
परमेश्वरानं त्याला आणि त्याच्याद्वारे जगातील सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचा अभिवचन दिलं.
त्यानं त्याला अभिवचन दिलं की समुद्रकिनाऱ्यावर जितकी वाळू आहे,
तितकी त्याची संतती होईल
आणि आकाशातील ताऱ्यांएतकी.
आब्राहामाने देवावर विश्वास ठेवला.
त्याच्या या विश्वासामुळे देवानं त्याला धर्मिक असं गणलं
आणि त्याला आपला मित्र म्हटलं.
एक दिवस परमेश्वरानं आब्राहामाची परीक्षा घेतली
की तो त्यावर विश्वास ठेवतो की नाही आणि त्याची आज्ञा पाळतो का.
त्यानं आब्राहामास म्हटलं की पुत्राचं बलीदान कर.
आब्राहामास माहीत होतं की त्याच्या एकूणते पुत्राद्वारे
देवानं अनेक वंशज देण्याचं अभिवचन दिलं होतं.
तरीही त्यानं देवावर विश्वास ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली.
म्हणून आब्राहामाला आपल्या पुत्राचा बली देण्याची तयारी केली.
अबराहामाने आपला सुरा उगारला,
परंतु परमेश्वराने म्हटलं,
"अब्राहामा! मुलाला मारू नको,
मला माहीत आहे की तुला माझे भय आहे
आणि तू माझे आज्ञा पाळण्यास तयार आहेस."
तेव्हा अब्राहामानं एका एडक्यास पाळलं,
त्याची शिंगं झुडपात गुंतलेली होती,
म्हणून अब्राहामाने एडका घेतला, ज्यास परमेश्वराने पुरवलं होतं
आणि त्याचा बली आपल्या पुत्राऐवजी दिला.
जेव्हा देवाने एडका अब्राहामाच्या पुत्राऐवजी बलिदानात दिला,
त्यानं लोकांप्रती आपलं मोठं प्रेम दाखवलं.
त्याचं प्रेम एका चांगल्या पित्यासारखं जे आपल्या पुत्रां करितात तसं असं होतं.
या घटनेद्वारे देवाने मानवजातीसाठी मरण्याकरता केलेल्या बलिदानाची योजना प्रगट केली.
फार आधी परमेश्वरानं संदेश त्यांना हे प्रगट केलं होतं
की अब्राहामाच्या संतानांच्या ऐवजी मरण्याकरता एक पापविरहित पुरुष पाठवीन,
जो त्यांचं पाप आणि लज्जा काढून टाकील.
त्याच्या महान बलिदानाच्या द्वारे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात
त्यांना परमेश्वरासोबत देवाच्या राज्यात ठेवण्याकरिता मार्ग मोखळा केला.
संदेश त्यांनी या तुळशी0ला मसिहा असं म्हटलं.
त्याने म्हटलं परमेश्वरानं लोकांना वाचवण्यासाठी
आणि त्यांचा राजा होण्यासाठी आणि परमेश्वराच्या नामात
त्यांच्यावर राज्य करण्यासाठी मसिहाला पाठवलं.
ज्याच्या युगाच्या अनेक शतकां पूर्वी संदेशाने मसिहाबद्दल बोलले होते
की मसिहा काय करेल आणि त्याचं काय होईल.
दावीद संदेशत्यांनी "देवाचा पुत्र" हे शीर्षक
मसिहाचे परमेश्वरासोबतचे असलेले घनिष्ठ संबंध स्पष्ट करण्यासाठी
आणि त्याचे तारणारा आणि राजा म्हणून कार्य स्पष्ट करण्यासाठी उपयोगात आणलं.
यशयाच्या संदिष्ट्यानी म्हटलं, "कुमारी गर्भवती होऊन पुत्र पसवेल."
तिचा पुत्र परमेश्वराचे अनंत वचन आहे.
जो परमेश्वराला जगास प्रगत करील.
संदिष्ट्याने हे देखील लिहिलं की मसिहाचा जन्म बेतलेहेम येथे होईल
आणि तो येरूशलेमेत त्यांचा राजा म्हणून प्रवेश करेल.
की त्याचा जवळचा मित्र चांदीच्या तीस नाण्यांसाठी त्याचा विश्वासघात करेल.
संदेशत्यांनी म्हटलं की मसिह आपल्या जीवनाचं बलिदान करेल.
परंतु परमेश्वर त्याला तिसऱ्या दिवशी मृतांतून जीवनात करील.
संदेशत्यांनी त्याला मनुष्याचा पुत्र मनुष्याचा आणि म्हटलं, "तो परमेश्वराच्या उपस्थितीत स्वर्गात जाईल
दोन हजार वर्षांपूर्वी एक विशेष व्यक्ति ह्या जगात राहिली.
त्याचं नाव येशू होतं.
येशूच्या जीवनाविषयी संदेशत्यांनी सांगितलं होतं ते पूर्ण झालं का?
हा चित्रपट येशू कोण आहे हे सांगतो आणि वचनाती त्याच्या कार्याचं वर्णन करतो.
या चित्रपटात एक कलाकार येशूची भूमिका साकार करीत आहे.
हे करण्यासाठी कोणीही योग्य नाही.
परंतु हा चित्रपट यासाठी तयार करण्यात आला
की लोकांना येशूबद्दल कळावं आणि त्याच्या जीवनापासून काही शिकावं
आणि परमेश्वराने ज्या आशीर्वादाबद्दल अभिवचन दिलं तो प्राप्त करावा.
"प्रिय थेओफिल, आपल्या साठी त्या क्रमाप्रमाणे त्या गोष्टी लिहितो आहे.
ज्या आपल्यामध्ये घडल्यात. यासाठी विप्रत्ये गोष्टीचा संपूर्ण सत्य आपल्याला समजावं.
ज्या काळी कैसर आगुस्त हारूनचा सम्राट आणि महान हेरोद यहूदीचा राजा होता,
देवानं गॅब्रियल देवदूतालानाझरेत नगराच्या एका कुमारीकडे पाठवलं,
जिचं नाव मरिया होतं.
हे मरिये, भीव नकोस.
कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे.
तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल.
त्याचे नाव तू येशू ठेव.
हे कसं शक्य आहे? कारण मी कुमारी.
पवित्र आत्मा तुझ्यावर येईल.
त्यामुळे ते पवित्र बाळक परात्पर देवाचा पुत्र म्हणले जाईल.
त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.
मरिया आपली बहीण अलिशिबाला भेटायला यहुदियात एक नगरात गेली.
ती पण आश्चर्यकारकपणे गर्भवती होती.
अलिशिबा! -मरिये, माझ्या बहीणी.
तू सर्व स्त्रियांमध्ये अधिक धन्य आहेस.
धन्य ते बाळक ज्याला तू जन्मलेशील.
तुझ्या आशीर्वाद ऐकतात. माझ्या उदरातील बाळानं आनंदाचा उडी मारली.
माझा जीव निश्चित प्रभुला थोर मानतो.
आणि माझा आत्मा माझ्या तारणारा देवात आनंदी आहे.
आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. नासरेचचे सर्व लोक हो ऐका.
नाझरेथचे सर्व लोक हो ऐका.
अगस्तु कैसर नं हुकूम दिला आहे
की गालील आणि यहुदा प्रांताच्या
सर्व लोकांची जनगणना व्हावी
म्हणून सर्व लोकांनी आपापल्या मूळ गावी जाऊन
नावनोंदणी करावी.
आणि मरिया ही यहुदियातल्या बेतलेहेम गावी
आपल्या वांङ्गीशे झालेल्या जोसेपाबरोबर नोंदणी करायसाठी गेली.
पण त्यांना राहायला कुठं जागा मिळाली नाही.
जे एकमात्र ठिकाण त्यांना मिळालं ते होतं एक गोठा.
त्याच परिसरात काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते.
तेव्हा देवाचा प्रकाश त्यांच्या डोळ्यांत उभारायला आणि देवाच्या महिम्याचा तेज सख्ख होति पसरला.
आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे.
तोच ख्रिस्त प्रभू आहे.
मेंढपाळ धावत-धावत नवीन जन्मलेल्या गव्हाणीत निजलेल्या बालकाला पाहायला आले.
ते जे प्रथम लोक होते ज्यांनी कुमारी मातेद्वारा जन्मलेल्या तारकाचा शुभ संदेश जाहीर केला.
एका आठवड्यानंतर म्हणजे त्याच्या सुंतेच्या दिवशी त्याने त्याचं नाव येशू ठेवलं.
मग योसेफ आणि मारिया बालकाला देवापुढे ठेवण्यासाठी येरुशेलेमला गेले.
तिथं मंदिरात शिमोन नावाचा कोरिएक नेतीमान आणि भक्तिमान मनुष्य होता.
प्रभूच्या क्रिस्ताला पाहण्यापूर्वी तुला मरण येणार नाही,
असं पवित्र आत्म्यानं त्याला सांगितलं होतं.
हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणं आपल्या दासाला शांतीनं बोलावून ने.
मी माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. हे बालक देवातून होणारे आहे.
आपण उपहिता आशीर्वादित असा.
मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्व काही विधी पूर्ण केल्यावर
ते येरुशलेमहून आपल्या गावी नाजरेतला परत आले.
येशू बारा वर्षांचा झाल्यावर योसेफ आणि मारिया येशूला आपल्याबरोबर
वलांडण सणासाठी येरुशेलेमला घेऊन गेले.
परतीच्या प्रवासात असताना येशू मागेच राहिला हे त्यांच्या लक्षात आलं नाही.
म्हणून ते त्याचा शोधकर पुन्हा मागे येरुशेलेमला गेले.
तेव्हा तिसऱ्या दिवशी तो त्यांना मंदिरात गुरुमंडळामध्ये संवाद करताना आढळला.
हा कोणाचा पुत्र आहे तो असले प्रश्न विचारतोय?
हा नाझरेथचा आहे. आम्हाला वाटलं तो आमच्या बरोबरच आहे.
कृपया ह्याबद्दल त्याला क्षमा करा.
जे त्याचं ऐकत होते ते सर्व धक्क झाले.
बाळ, तू आमच्याशी असं का वागलास?
तुझे वडील आणि मीचिंतातूर होऊन, तुला किती शोधत होतो.
तुम्ही मला का शोधत होता? तुम्हाला माहीत नाही का मी माझ्या पित्याच्या कामात असावं?
नंतर तो आईवडिलांबरोबर नाझरेथला गेला.
येशू शरीरानं आणि बुद्धीनं वाढला आणि तो देवाचा आणि माणसांचा आवडता झाला.
सम्राट टिबियाच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत
जेव्हा पंत पिलात हा येहूदा प्रांताचा राज्यपाल
आणि हेरोद गालिल प्रांताचा राजा
आणि हन्ना आणि कयफा हे प्रमुख याजक होते.
देवाचा संदेश रानात व्यूहानाला प्राप्त झाला
आणि तो जार्देनच्या सर्व प्रांतात जाऊन पापक्षालनासाठी
पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा प्रचार करू लागला.
आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करा आणि बाप्तिस्म्य घ्या!
तरच तुम्हाला देव पापक्षमा करेल.
त्या यशयाच्या संदेशटाच्या पुस्तकात लिहिलं आहे,
रानात कोणीतरी ओरडत आहे की
देवासाठी मार्ग तयार करा.
त्याच्या प्रवासासाठी मार्ग सरळ करा.
प्रत्येक खोरं पूर्णपणे भरला जावो.
प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट केली जावो.
वाकडे तिकडे असलेले मार्ग सरळ करा आणि ओबड-धोबड मार्ग नीट करा
आणि संपूर्ण मनुष्यजाती देवाचं तारण पाहील.
आम्ही काय करावं? -अरे सापाच्या पिल्लांनो!
आम्ही काय करावं अशी आपली इच्छा आहे?
कोणत्या मार्गाने आम्ही जावं आम्हाला सांग.
ज्या कोणाकडे दोन सतरे आहेत
त्यातून एक त्या माणसाला द्या ज्याच्याकडे नाही.
आणि ज्यांच्याकडे अन्न आहे त्यांनी वाटून खावं.
गुरुजी.
आम्ही जकातदार आहोत.
आम्ही काय करावं?
कायद्यापेक्षा अधिक घेऊ नका.
आणि आमच्याबद्दल काय? आम्ही काय करावं?
कोणाकडूनही जबरदस्तीने पैसे घेऊ नका.
कोणावरही खोटे आरोप लावू नका.
आपल्या कमाईतच संतुष्ट असा.
आम्हाला सांग, काय तूच ख्रिस्त आहेस?
मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो.
पण कोणीतरी येतो आहे जो माझ्याहून अतिश्रेष्ठ आहे.
त्याच्या पायतळांचे बंध तोडवायला देखील मी योग्य नाही.
तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीनं आणि पवित्र आत्म्यानं करेल.
त्याच्या हातात त्याचं सूप आहे
ज्यानं तो धान्यापासून कोंडा वेगळा करून आपल्या कोठारात साठवेल.
आणि पवित्र आत्मा देहरुपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला.
त्याचवेळी आकाशातून वाणी झाली,
"तू माझा परम प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे."
येशूने आपल्या सेवेला आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता.
नंतर पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झालेला असातो यार्देन सोडून रानात गेला.
तिथे शैतानानं त्याची 40 दिवस परीक्षा घेतली.
या कालावधीत त्यानं काहीही खाल्लं नाही.
-आणि शैतान त्याला म्हणाला, -जर तू देवाचा पुत्र आहेस
तर आज्ञा कर की हा धोंडा भाकर हो.
असे लिहिलं आहे, "मनुष्य केवळ भाकरीने नवे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल.'
मग शैतानानं त्याला एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्य एकाच क्षणात दाखवली.
मी तुला हे सर्व वैभवशाली राज्य आणि अधिकार देईन.
ती मला देण्यात आली आहे आणि माझ्या मर्जीला येईल त्याला मी ते देऊ शकतो.
जर तू माझी आराधना करसील तर हे सर्व तुझं होईल.
लिहिलं आहे, "प्रभू तुझा देव त्याची आराधना कर
आणि त्याचीच सेवा कर."
मग शैतानानं त्याला यरूशलेममधल्या मंदिराच्या उंच टोकावर उभं केलं.
तू जर देवाचा पुत्र आहेस तर इथून खाली उडी टाक.
कारण शास्त्रात लिहिलं आहे की तुझं रक्षण करण्यास देव आपल्या दूतांना आज्ञा देईल
आणि तुझ्या पायांना इजा होऊ नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलतील.
शास्त्रात म्हंटलं आहे, "प्रभू तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको."
मग ज्या नाझरेथ गावी तो लहानाचा मोठा झाला,तिथं तो आला.
-कशी आहेस? -बरी आहे.
येशू परिपाठाप्रमाणे विश्रामदिनी मंदिरात गेला.
आणि त्याला यशयास संदेष्ट्याच्या पुस्तकातलेकाही शास्त्रपाठ वाचायला सांगितले.
देवाचा आत्मा माझ्यावर आला आहे.
त्याने मला दीनास सुवार्ता सांगण्यासाठी निवडला आहे.
त्याने मला बंधिवानांची सुटका करण्यास आणि आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी पाठवले आहे.
त्रासलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी
आणि घोषणा करण्यासाठी की देव आपल्या लोकांना तारील अशी वेळ आली आहे.
तो चांगलं बोलतो.
धर्मशास्त्राचे हे वचन आज पूर्ण झाले.
-जे वाचत असता तुम्ही ऐकलं. -शास्त्राचं वचन पूर्ण झालं?
-पण ही वचनं केवळ मसीहच पूर्ण करू शकतं. -आम्हाला कसं कळायचं?
खरं तर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की अरे वैद्य स्वतःलाच बरा कर.
तुम्ही असेही म्हणालात आपल्या गावी तेच कार्य कर जे आम्ही ऐकलं, तू कफर्णूमात केलंस.
मी तुम्हाला सांगतो कोणीही संदेश्टा स्वदेशात कधीही मान्यता पावत नाही.
अशा प्रकारे येशूनं स्वतःला प्रकट केलं
की देवाने पाठवलेला ख्रिस्त हा लोकांच्या उद्धारासाठी आला होता.
पण ह्या यहूद्यांनी त्याला ख्रिस्त म्हणून स्वीकारलं नाही.
ते त्याला डोंगरावरून ढकलू इच्छित होते.
पण तो गर्दीतून बाहेर पडला आणि आपल्या मार्गानं निघून गेला.
त्यानंतर गालिलातलं एक शहर कपर्नौममात आला.
रोमी जुलमी राज्याचं वर्चस्व सर्वदेशावर असल्यानं
त्यातून मुक्त होण्यासाठी सर्व लोक आतुरतेनं मसीहा येण्याची वाट पाहत होते.
-तुम्हाला शांती असो. -तुम्हालाही, गुरूजी.
-शिमोना, तुझ्या होडीत येऊ का? -का नाही?
आमच्याशी बोला! काही बोला!
आमच्याशी काही बोला ना. येशूजी, आम्हाला उपदेश द्या.
एके दिवशी दोन माणसं प्रार्थना करायला मंदिरात गेली.
एक धर्मपुढारी आणि दुसरा जकातदार होता.
धर्मपुढाऱ्यानं वेगळं उभं राहून अशी प्रार्थना केली.
"हे देवा, मी तुझे आभार मानतो की इतरांसारखा मी लालची, व्यभिचारी, बेईमानही नाही.
आणि आभार मानतो की हा जकातदारासारखा नाही.
हा आठवड्यातून दोनदा उपवास करतो. माझ्या प्रत्येक कमाईचा दशांश तुला देतो.
पण जकातदार दूर उभा राहून आणि आकाशाकडे वर न पाहता…
दुःखानं आपल्या छातीवर हात मारून घेत म्हणाला, "हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर."
मी तुम्हाला सांगतो, देवाच्या दृष्टीने जकातदार नीतीमान धरून घरी गेला पण धर्म पुढारी नाही.
कारण जो स्वतःला उंच करतो तो नमावला जाईल.
आणि जो स्वतःला नमवतो तो उंचावला जाईल.
आता होडी आणखी खोल पाण्यात ढकल…
आणि साथीदारांच् मासे पकडण्यासाठी जाळी सोड.
हो गुरूजी, आम्ही रात्रभर कष्ट करून थकलोत. पण काहीही मिळालं नाही.
पण जर तुम्ही असं म्हणता, तर मी पुन्हा जाळी टाकतो.
याकोब! योहान!
[आनंदानं खळखळून हसतो]
याकोब! योहान!
-तुमच्या होड्या इकडे आणा आणि आम्हाला सहाय्य करा!
आम्ही नाही येऊ शकत, आम्हाला पुष्कळ काम आहे.
हे पुष्कळ आहे.
एवढे मासे पुरे आहेत.
माझ्यापासून दूर व्हा, प्रभू.
कारण मी तर पापी आहे.
घाबरू नकोस.
इथून पुढं तू माणसं धरशील.
माझ्याकडे या आणि माझी वचन ऐका.
माझं ऐका म्हणजे तुवाला जीवन प्राप्त होईल.
जोपर्यंत देव प्राप्त होऊ शकतो त्याला शोधा.
जोपर्यंत तो जवळ आहे त्याला पुकारा.
दुष्ट आपला मार्ग सोडो आणि अधर्मी आपले विचार
आणि तो प्रभुकडे येवो.
म्हणजे तो त्यावर दया करेल आणि पूर्णपणे क्षमा करील.
तुम्ही आनंदात असाल आणि शांतीने जगाल.
येशू येत आहे. तो इथेच आहे. पाहा!
येशू! येशू!
कृपा करून माझ्या एकुलत्या एक मुलीला वाचवा. प्रभू दया करा.
अहो ती फक्त बारा वर्षाची आहे आणि मरणास टेकली आहे. कृपया माझ्या बरोबर चला.
यायीर, मला दुःख आहे.
येशू! -तुमची मुलगी मरण पावली आहे.
गुरुजींना आता त्रास देण्यात अर्थ नाही.
भीऊ नका. विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.
तुम्ही रडू नका.
ती मेली नाहीये, फक्त झोपली आहे.
मुली… उठ.
तिला काहीतरी खायला द्या.
मी तुम्हाला सांगतो, जे घडलं ते कुणालाही सांगू नका.
त्यानंतर त्यानं मत्तय लेवी नावाच्या जकातदाराला झकातीच्या नाक्यावर बसलेलं पाहिलं.
माझ्या मागे ये.
नंतर येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला.
तिथे रात्रभर तो देवाची प्रार्थना करत होता.
मग दिवस उगवल्यावर त्यानं बारा शिष्यांना बोलावलं आणि त्यांना प्रेषित पद दिलं.
शिमोन, ज्याला त्यानं पेत्र हे नाव दिलं.
आणि त्याचा भाऊ आंद्रिया…
याकोब…
आणि योहान,
फिलिप…
बर्थलमय…
मत्तय…
थोमा…
अल्फीचा पुत्र याकोब,
जिलोत म्हटलेला शिमोन…
यहुदा याकोबचा भाऊ…
आणि यहुदा इस्करीयोत, जो विश्वासघातकी होता.
धन्यते तुम्ही दीन, करण देवाचे राज्य तुमचं.
धन्यते तुम्ही भुकेलेले कारण तुम्ही तृप्त व्हाल.
धन्यते तुम्ही रडणारे कारण तुम्ही हसाल.
लोक तुम्हाला धिक्कारतात, नाकारतात, अपमान करतात.
मनुष्यपुत्रामळं तुम्हाला वाईट म्हणतात तेव्हा तुम्ही धन्य.
जेव्हा असं घडेल तेव्हा आनंद करा आणि नाचा गा.
स्वर्गात तुमचं प्रतिफल मोठं आहे.
त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यांस असंच केलं.
16, 17, 18, 19, 20 -17, 18, 19, 20.
माझ्याकडे एवढेच आहेत.
-म्हणजे काय, तुझ्याजवळ एवढंच आहे? आणखी दे! -हाय तुम्हाला, जे आता धनवान आहात.
तुम्ही तुमचा आयुष्य आराम भोगलात.
ह्याला श्रीमंत व्हायला नको? हा वेडा तर नाही ना?
हाय तुम्ही जे आता हसता आहात
तुम्ही शोक कराल आणि रडाल.
हाय तुम्हाला जेव्हा सर्व लोक तुम्हाला चांगलं म्हणतील,
त्यांच्या पूर्वजांनीही खोट्या संदेश्ट्यांशी असंच म्हटलं.
पण मी तुम्हा ऐकणाऱ्यांना सांगतो,
वैऱ्यावर प्रीती करा.
तुमचा द्वेष करणाऱ्यांचं बरं करा.
शाप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या.
कैरवर्तन करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा.
जो तुमच्या एका गालावर चपराक मारील…
त्याच्यापुढे दुसरा ही गाल करा.
जर कोणी तुझा कोट हिरावून घेतो त्याला तुझा सदराही दे.
जो कोणी तुझ्यापाशी मागतो त्याला दे.
आणि जो कोणी तुझी वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ती परत मागू नकोस.
इतरांशी तसंच वागा जसं तुम्ही आपल्यासाठी इच्छिता.
जर तुम्ही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करता तर तुम्हाला आशीर्वाद कसा मिळणार?
पापीही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात.
आणि जर तुम्ही बरं करणाऱ्यांचं बरं करता
तर तुम्हाला आशीर्वाद कसा मिळणार?
पापीही असंच करतात.
तिला कसा काय स्पर्श केला? तो तिच्याशी असा बोलू कसा शकतो?
लाजिरवाणं!
नाही! वैऱ्यावर प्रेम करा आणि त्याचं बरं करा.
पुनःप्राप्तीच्या आशेनं उसणं देऊ नका.
म्हणजे तुम्हाला मोठा प्रतिफल मिळेल.
तुम्ही परात्पर देवाचे पुत्र व्हाल.
तो कृतज्ञ आणि दुर्जन दोघांवरही उपकार करतो.
दयाळू असा जसं स्वर्गातला पिता दयाळू आहे.
आम्हाला वाचवू येशू!
दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कुणी काढणार नाही.
आरोप लावू नका म्हणजे तुम्हालाही आरोपी ठरोणार नाही.
क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल.
हे प्रभू, तुझ्या मार्गानं आम्हाला चालव.
द्या, म्हणजे तुम्हाला दिलं जाईल.
ज्या मापानं देता त्याच मापानं परत मिळेल.
एक आंधळा दुसऱ्याला मार्ग दाखवू शकत नाही.
तसं झालं तर दोघेही खड्यात पडतील.
तू आपल्या डोळ्यातलं मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ का पाहतोस?
गुरूजी आम्हाला वाट दाखवा. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू.
धन्य ती माता जिने तुला जन्म दिला, प्रतिपाल केला.
परंतु पर धन्य ते जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात.
मला या माणसाला जाणून घ्यायचं आहे.
तुम्हाला असं वाटतं का की तो मसीह आहे?
या धर्मगुरूंनं येशूला रात्रीच्या भोजनाचं आमंत्रण दिलं आणि येशू त्याच्या घरी जाऊन भोजनाला बसला.
चला मुलांनो बाहेर करा. ऐकलं ना? जा.
हे मुलं सारखी गडबड करत असतात.
ही इथे काय करते? मला माहीत नाही.
-ही काय इथे करते?
जर हा खरंच संदेष्टा असता तर त्याला कळलं असतंही बाई कोण आहे
जी त्याला स्पर्श करते आहे.
त्यानं जाणलं असतं ती किती पापी जीवन जगते.
शिमोन, मला माहीत आहे ती स्त्री कोण आहे.
मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.
एका माणसाचे दोन कर्जदार होते त्यापैकी
एकाला पाचशे आणि दुसऱ्याला पन्नास मोहरा देणं होतं.
दोघेही कर्ज परत करू शकत नव्हते म्हणून त्या दोघांनाही माफ केलं.
तर कोण त्याच्यावर अधिक प्रेम करेल?
-मला वाटतं ज्याला अधिक माफ केलं तो. -ठीक बोललास.
या बाईला पाहतोस ना?
मी तुझ्या घरी आलो, तेव्हा तू मला पाय धुण्यासाठी पाणी दिलं नाहीस.
पण हिनं आपल्या अश्रूंनी माझे पाय भिजवून केसांनी ते पुसले.
तू माझं चुंबन घेऊन स्वागत केलं नाहीस.
पण मी आल्यापासून ही माझ्या पायांची चुंबनं घेते.
तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाहीस. पण हिनं माझ्या पायाला अत्तर लावलं.
मी तुम्हाला सांगतो,
हिनं जे प्रेम दाखवलं ते सिद्ध करतं की तिची पुष्कळ पापं क्षमा झाली.
ज्यांना थोडक्यांची क्षमा झाली, ते थोडकीच प्रीती करतात.
तुझ्या पापांची क्षमा झाली.
तुझ्या विश्वासानं तारण मिळालं.
येशू देवाच्या राज्याचा शुभ संदेश सांगत नगरोनगरी गावोगावी फिरत होता.
त्याच्या बरोबर बारा प्रेषित आणि दुष्ट आत्म्यापासूनमुक्त झालेल्या कित्येक स्त्रिया होत्या.
मरिया जिला मग्दालिया म्हणत,
योहान्ना, हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको…
आणि सुसान्ना.
रोमी राज्यद्वारे नियुक्त गालीलचा शासनक हेरोदानं आपल्या भावजयीशी विवाह केला होता.
योहान बाप्तिस्मा करणाऱ्यानं जेव्हा यावर दोष लावला तेव्हा त्याला बंदीगृहात टाकलं.
आम्ही नाईन गावाच्या वेशीजवळ पोहोचताच, लोक एका मृत माणसाला बाहेर नेत होते.
तो एका विधवेचा एकुलता एक पुत्र होता.
जेव्हा येशूनं त्याला पाहिलं तेव्हा त्याचा अंतःकरण कळवळलं
आणि त्याने तिरडीला स्पर्श करून म्हटलं, "मुला, मी तुला सांगतो, उठ."
तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला
आणि येशूनं त्याला त्याच्या आईच्या हवाली केलं.
त्याला विचार की योहाननं म्हटलं जो येणारा आहे तो तूच आहेस?
की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?
गुरूजी!
गुरूजी!
बाप्तिस्मा करणारा योहानानं विचारण्यास पाठवलं. की तू तोच आहेस जो येणारा आहे
की आम्ही आणखी कुणाची वाट पाहिली हवी?
तुम्ही जे पाहिलं आणि ऐकलं, ते योहानाला जाऊन सांगा.
आंधळे पाहू लागतात. लंगडे चालू लागतात.
जे माझ्या विषयी शंका घेत नाही, ते धन्य आहेत.
मला वर उचला ना.
माझ्या खांद्यावर बस. आता दिसतोय? मला येशू दिसतो.
पेरणारा आपलं बी पेरायला निघाला.
आणि तो पेरत असता काही बिया वाटेवर पडल्या. त्या तुडवल्या गेल्या.
आणि आकाशातल्या पाखरनी ते खाऊन टाकलं.
आणि काही बिया खडकाळ जमिनीवर पडल्या.
त्या उगवल्या पण ओलावा नसल्यामुळं उगवताच वाळून गेल्या.
काही बिया काटेरी झाडांमध्ये पडल्या.
काटेरी झाडांच्या बरोबर वाढल्यानं त्यांची वाढ खुंटली.
काही बिया चांगल्या जमिनीत पडल्या
आणि रोपटं उगवून त्याने फळं दिली. प्रत्येकाने शंभर पट.
गुरूजी, जेव्हा लोक जमतात तेव्हा तुम्ही दाखल्यांद्वारे का बोलता?
देव राज्याची रहस्यं समजण्याचं ज्ञान तुम्हाला दिलं आहे.
पण इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत.
यासाठी की त्यांना दिसत असताही पाहू नये. ऐकू असताही समजू नये.
या दाखल्याचा अर्थ असा आहे…
बी म्हणजे, देवाचं वचन आहे.
वाटेवर पडलेलं बी त्यांना दाखवतं जे ऐकतात खरे.
पण शैतान येऊन नंतर त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.
यासाठी की विश्वास ठेवून त्यांचं तारण होऊ नये.
खडकावर पडलेलं बी त्यांना दाखवतं जे वचन ऐकून आनंदाने स्वीकारतात खरे.
पण मूळ नसल्यामुळं केवळ काही काळ विश्वास करतात.
आणि परीक्षेची वेळ येताच ते गळून पडतात.
काटेरी झाडांमध्ये पडलेलं बी त्यांना दर्शवतं जे ऐकतात
पण संसाराच्या चिंता, धन आणि विषयसुखानं घेरल्यानं वाढ खुंटते
आणि ते कधीच परिपक्व होत नाहीत.
चांगल्या मातीत पडलेलं बीज
त्यांना दर्शवतं जे वचन ऐकून चांगल्या आणि आज्ञाकारी हृदयात साठवतात
आणि फळ येईपर्यंत धीर धरतात.
कोणी दिवा लावून तो भांड्याखाली ठेवत नाही, कि पलंगाखाली नाही,
तर तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की आत येणाऱ्याला उजेड दिसावा.
जे झाकून ठेवले आहे ते प्रकट होणार आहे,
आणि जे गुप्त ठेवले आहे ते प्रकाशात आणले जाईल.
तुम्ही कसे ऐकता याविषयी जागरूक राहा.
ज्याच्या जवळ आहे त्याला अधिक दिलं जाईल,
आणि ज्याच्या जवळ नाही त्याचं जे आहे म्हणून त्याला वाटतं तेदेखील त्याच्याकडून काढून घेतलं जाईल.
गुरूजी, आपली आई आणि भाऊ बाहेर वाट पाहत आहेत. आपल्याला भेटण्यासाठी.
माझी आई आणि भाऊ तेच जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात.
एके दिवशी येशू आपल्या शिष्यांसह होडीत चढला आणि म्हणाला, "चला, आपण सरोवराच्या पलीकडे जाऊया."
-जेव्हा शिष्य होडी हाकत होते तेव्हा येशू झोपी गेला.
अहो! गुरूजी! गुरूजी! येशू!
आपण सर्व मरणार आहोत!
आपण लाटांनी घेरले गेलेले आहोत. आम्हाला वाचवा, प्रभू!
आपण नक्कीच वाचणार.
तुमचा विश्वास कुठे आहे?
मग ते गालीलच्या समोरच्या गरसेकरांच्या प्रदेशी पोहोचले.
हे येशू, परात्पर देवाचा पुत्र!
काय हवंय तुला माझ्याकडून?
-मी तुला सांगतो, मला यातना देऊ नकोस. -काय आहे तुझं नाव?
सेना.
प्रभुजी, दया करा. आम्हाला त्या नरकात जाण्याची आज्ञा करू नका.
आम्हाला त्या कळपात जाऊ द्या, त्या डुकरांच्या.
-हे! परत या! -थांबा! थांबा!
-भूत त्या माणसातून निघून, डुकरांत शिरली. -परत या!
इथून दूर निघून जा!
हे जादूगारा, चल निघ! इथून दूर निघून जा!
चालता हो! चालता हो!
तुम्ही जिथे जाल तिथेच मी ही येईन.
मलाही तुमच्या बरोबर येऊ जा.
घरी परत जा. देवानं तुझ्यासाठी काय केलं ते सांग.
येशू आणि त्याचे शिष्य लोकांपासून विभक्त होण्यासाठी
बेतसैदा नावाच्या गावाकडे निघून गेले.
लोकांना हे समजताच ते त्यांच्या मागे गेले.
संध्याकाळ होत असता पेत्र येशूला म्हणाला…
गुरुजी, या लोकांना निरोप द्या,
म्हणजे ते सभोवतालच्या गावात आणि शेतमाळात जाऊनखाण्याची आणि राहण्याची सोय करतील.
ही जागा निर्मनुष्य आहे.
तुम्हीच त्यांना खायला काहीतरी द्या.
पण आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत, एवढेच.
धन्य हो तू हे प्रभू आमच्या देवा, सृष्टीच्या राजा,
जो या पृथ्वीतून अन्न उगवतोस.
हा तर चमत्कार आहे.
लोक माझ्याविषयी काय म्हणतात?
काही जण तुला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतात.
तर इतर आपल्याला एलिया म्हणतात.
आणि काही जण म्हणतात, की प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक पुन्हा जिवंत झाला आहे.
आता तुम्ही सांगा, तुम्ही माझ्याविषयी काय म्हणता?
तु देवाचा मसीहा आहेस.
तुम्ही हे कोणाला सांगू नका.
मनुष्याचा पुत्र पुष्कळ दु:ख सहसून नाकारला जाईल.
त्याला मारण्यात येईल.
पण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत होईल.
-तुमच्यापैकी कोण माझ्या मागे येईन? -प्रभुजी, मी तुमच्या बरोबर येईन.
पण आधी मी जाऊन घरच्या लोकांचा निरोप घेतो.
जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहत राहतो तो देवाच्या राज्याला लायक नाही.
जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्यानं आत्मत्याग करावा.
आणि रोज स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल.
पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला मुकवेल तो त्याला वाचवेल.
मनुष्यानं सर्व जग मिळवला आणि स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतला, तर काय लाभ?
जर कोणी माझ्याने व माझ्या शिक्षणाची लाज धरतो
तर मनुष्याचा पुत्रही त्याची लाज धरील जेव्हा तो आपल्या
पिता आणि पवित्र दूतांच्या गौरवासह येईल.
मी खरं सांगतो…
इथं कोणी असे आहेत की जोपर्यंत देवाचं राज्य पाहत नाहीत मरणार नाहीत.
नंतर येशू पेत्र, योहान आणि याकोब यांना बरोबर घेऊनप्रार्थना करायला डोंगरावर गेला.
तो प्रार्थना करत असता त्याच्या चेहऱ्याचं रूपांतर होऊन त्याचं वस्त्र पांढराशुभ्र आणि चकचकीत झालं.
अचानक दोन माणसं त्याच्याशी बोलताना दिसली.
ते स्वर्गीय गौरवात मोशे आणि एलिया होते.
तू देवाचा संकल्प पूर्ण करणार.
तुझा मृत्यू येरुशलेममध्ये होईल.
ते त्याच्यापासून निघून जात असता पेत्रनं येशूला म्हटलं…
गुरूजी, आपण इथे आहोत ते किती चांगलं आहे.
आता आम्ही तीन मंडप करतो.
एक आपल्यासाठी,
-एक मोशेसाठी… -पेत्र हे बोलत असता…
…एका ढगाने येऊन आच्छादन केलं. -…आणि एक एलियासाठी.
आणि शिष्य घाबरले आणि ढगातून आवाज आला…
"हा माझा पुत्र आहे, जो निवडलेला आहे, त्याचं ऐका."
गुरूजी, गुरूजी, मी विनंती करतो, माझ्या मुलाला येऊन पाहा.
कृपया, कृपया त्याची मदत करा.
कारण हा माझा एकुलता एक पुत्र आहे.
मी आपल्या शिष्यांना दूरात्मा काढण्याची विनंती केली
पण त्यांना नाही जमलं.
अहो अविश्वासू आणि कुटीलपिढीच्या लोकं,
कुठवर मी तुम्हाबरोबर राहू आणि सोसू?
तुझ्या मुलाला इकडे आण.
पहा! त्याचा चेहरापण बरा झाला!
काय आश्चर्य आहे.
आम्हाला प्रार्थना करायला शिकवा, जशी योहानानं आपल्या शिष्यांना शिकवली.
प्रार्थना ह्या प्रकारे करा, "हे आमच्या स्वर्गातील पिता,
तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो.
जसं स्वर्गात, तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची रोजची भाकर आम्हाला दे.
आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक घृणाला क्षमा करतो.
आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सांभाळ.
मागा म्हणजे तुम्हाला मिळेल.
शोधा, म्हणजे सापडेल.
ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल.
कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं.
जो कोणी शोधतो त्याला सापडतं.
जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडलं जाईल.
तुमच्यापैकी असा कोण बाप आहे जो आपल्या मुलानं मासा मागितला तर साप देईल?
किंवा अंडं मागितलं तर विंचू देईल?
तुम्ही वाईट असताही आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचं समजता,
तर स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल.
मी तुम्हाला सांगतो,
चिंता करून का आपल्या जीवाविषयी की काय खावं.
-किंवा शरीरावर काय पांघरावं.
कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे.
कावळ्यांकडे बघा.
ते पेरत नाहीत, कापणीही करत नाहीत, की त्यांना कोठारही नाहीत.
तरी देव त्यांचं पोषण करतो.
पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात की नाही?
चिंता करून तुमच्यातला कोण आपल्या आयुष्याचे दिवस वाढवू शकतो?
जर तुम्ही एवढी लहान गोष्ट करू शकत नाही तरी चिंता कशाला करता?
या फुलांचा विचार करा. कशी वाढतात.
कष्ट करत नाहीत, कातत नाहीत.
तरी सोलोमन राजादेखील आपल्या सर्व वैभवात यातल्या एकासारखाही सजला नव्हता.
जर देव जे गवत आज रानात आहे आणि उद्या भट्टीत टाकलं जातं त्याला असा पोशाख घालतो…
तर तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालील.
-बोला अल्पविश्वासीयो. -आमचा विश्वास वाढवा.
तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढासरी विश्वास असता
आणि या झाडाला म्हणाला असतात की मुळासकट उपटून समुद्रात जा आणि उगव
तर त्यानं तुमचं ऐकलं असतं.
पापात पडण्याचा मोह तर जरूर येतो;
पण हाय त्या मनुष्याला ज्याच्यामुळं हा मोह येतो.
तो या लहानातल्या एकाला पापात ढकलण्याचं कारण बनतं,
त्याला त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून समुद्रात टाकावं हे योग्य.
देवाचं राज्य कश्यासारखं आहे? ते असं आहे…
एक मनुष्य मोहरीचा दाणा घेऊन आपल्या शेतात पेरतो.
तो वाढून त्याचं झाड होतं आणि आकाशातली पाखरं त्याच्या फांद्यांत राहू लागतात.
तो काय बोलतो ते मला समजत नाही.
अहो, तुम्ही जकातदार आणि इतर पापी लोकांबरोबर का खाता आणि पिता?
निरोग्याला वैद्याची गरज नसते तर केवळ रोग्याला असते.
मी नीतिमानांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो नाही आहे,
तर पाप्यांसाठी आलो आहे.
आम्हाला देवाच्या राज्याबद्दल सांगा. अजून काही आहे का?
माझ्या प्रियजनांनो, भिऊ नका,
कारण तुमच्या पित्याची इच्छा आहे तुम्हाला राज्य द्यावं.
तुमचं सर्व काही विकून धन गरिबांना वाटा
आणि जिर्ण न होणाऱ्या अशा पिशव्या बनवून धन स्वर्गात साठवा,
जिथं ते कधीच कमी होत नाही.
कारण तिथं कोणी चोर येत नाही,
ते कसराही लागत नाही.
जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मनही लागलेलं आहे.
बाई, तू आपल्या रोगापासून मुक्त झाली आहेस.
पाहा! पाहा! ती बरी झाली! हा चमत्कार आहे!
खरंच ते बरी झाली या आणि पाहा!
प्रभू, तुझी स्तुती असो!
18 वर्षांचं आजारपण गेलं!
देव तुला सुखी ठेवो!
आठवड्याचे सहा दिवस आहेत ज्यात काम केलं जातं
म्हणून त्या दिवसांत येऊन बरे व्हा.
पण विश्राम दिवशी अजिबात नको.
अहो, ढोंगी लोक हो!
तुमच्यापैकी प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढव विश्रांती दिवशी
गोठ्यातून सोडून पाण्यावर नेत नाही का?
ही तर अब्राहामची कन्या आहे जिला शैतानानं अठरा वर्षं बांधून ठेवलं होतं.
विश्राम दिवशी बंधनातून सोडता येत नाही का तिला?
अहो श्रेष्ठ गुरूजी.
अनंत जीवनप्राप्तीसाठी, मी काय केलं पाहिजे?
तू मला श्रेष्ठ का म्हणतोस?
देवावाचून कोणीही श्रेष्ठ नाही.
तुला आज्ञा तर माहीत आहेत.
व्यभिचार करू नकोस,
खून करू नकोस, कुणावरही खोटे आरोप ठेवू नकोस.
आपल्या आईबाबांचं सन्मान कर.
मी तर लहानपणापासून ह्या सर्व आज्ञा पाळीत आलो आहे.
अत्यापय तुला एक गोष्ट करणं जरूरी आहे.
तुझं असेल नसलेलं विकून गरगरिबांना वाटून टाक.
म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल
आणि मग माझ्या मागे ये.
परंतु आम्ही तर व्यापारी आहोत. धनवान.
धनवानाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणं किती कठीण आहे.
धनवानाला देवाच्या राज्यात प्रवेश करणं ह्यापेक्षा उंटानं सुईच्या निळ्यातून जाणं सोपं आहे.
तर मग कोणाचं उद्धार होणं शक्य आहे?
मनुष्याला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.
देवाचं हे राज्य निश्चित कोणत्या ठिकाणी असेल?
देवाचं राज्य दृश्य रूपात कधी येत नाही.
असं कोणी म्हणणार नाही, "पाहा, ते इथं आहे किंवा तिथं आहे."
कारण देवाचं राज्य तुमच्या मध्ये आहे.
वेळ येईल तुम्ही मनुष्यपुत्राचे दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची इच्छा कराल
पण तो दिसणार नाही.
वीज आकाशाच्या एका टोकाला चमकून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश
ते तसा मनुष्यपुत्र त्याच्या दिवशी प्रकट होईल.
प्रथम तो फार दुःख भोगेल आणि ह्या पिढीपासून नाकारला जाईल.
धर्मशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश आणि पृथ्वी नाहीशी होणं सोपं आहे.
मी तुम्हाला सांगतो पुष्कळ राजे आणि संदेश्ट्यांनी जे तुम्ही पाहात आणि ऐकतात ते सर्व…
पाहणं आणि ऐकणं इच्छिलं पण तसं झालं नाही.
-आम्ही काय करावं? -धर्मशास्त्र काय म्हणतं?
तुम्ही त्याचं काय अर्थ काढता?
तू प्रभू तुझ्या देवावर
पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने प्रेम कर.
शेजाऱ्यावर आपल्यासारखंच प्रेम कर.
तू ठीक बोललास. हेच कर म्हणजे जगशील.
माझा शेजारी कोण आहे?
हे सैनिक तर नव्हेच.
तो कैसर असेल.
एकदा एक मनुष्य यरुशलेमहून येरीहोला जात असताना
लुटारूंच्या हाती सापडला.
त्याचं वस्त्र काढून मारलं आणि अर्धमेला टाकून निघून गेले.
मग एक धर्मगुरू समज त्या वाटेनं जात होता.
त्याने त्याला पाहून तो दुसऱ्या वाटेनंच चालता झाला.
त्याचप्रमाणे तसाच एक याजक त्या ठिकाणी आला.
तोही त्याला पाहून दुसऱ्या वाटेनं चालता झाला.
मग एक शोमरोनी त्या वाटेनं चालला असता
त्याला पाहून त्याचा त्याला कळवळा आला.
त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांवर तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या.
आणि त्याला त्या गाढवावर बसवून उतारशाळेत आणलं आणि त्याची काळजी घेतली.
दुसऱ्या दिवशी त्याने दोन मोहरा काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटलं, "त्याची काळजी घ्या."
आणि ह्यापेक्षा जर अधिक खर्च कराल तो मी परत आल्यावर देईन.
तर या तिघांपैकी कोणी त्या मनुष्याबाबत शेजारी ठरला?
ज्याने दया केली तो.
तर तूही तसंच कर.
बालकांना माझ्याजवळ येऊद्या. त्यास मनाई करू नका.
कारण देवाचं राज्य त्यांच्यासारख्यांचं आहे.
मी तुम्हाला सांगतो.
जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही
त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही.
जो कोणी या बालकाचा माझ्या नावानं स्वीकार करतो तो माझा.
आणि जो कोणी माझा तो मला पाठवणाऱ्याचा स्वीकार करतो.
तुम्हामध्ये सर्वात लहान तोच सर्वात होय.
अहो, काय चाललं आहे? काय आवाज आहे?
नाझरेथचा येशू इथून जात आहे.
अहो येशू!
येशू!
हे दाविदाचे पुत्र, माझ्यावर तुम्ही दया करा!
-तुझ्यासाठी मी काय करू? -मला परत दृष्टी पाहिजे.
मग पाहा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं.
मी पाहू शकतो!
मला दिसू लागलं!
मला दिसू लागलं!
येशू यरूशलेमला जात असता मोठ्या संख्येनं लोक सर्वत्र त्याला मिळू लागले.
मार्गात लोक त्याला तारणमार्गाबद्दल
आणि देवाच्या राज्याबद्दल अधिक शिक्षण दे, असं म्हणत होते.
खरोखर हा मनुष्य संदेष्टा आहे. माझ्या प्रभू, माझ्या देवा, मला तार!
हे प्रभू, आम्हाला तार! आम्हाला तार!
देवाची स्तुती असो! आम्हाला सत्य मार्ग दाखव, प्रभू!
आपला प्रभू आणि देव म्हणून लोक येशूचा स्वीकार करू लागले.
यरिहोमध्ये जक्कय नावाचा जकातदार येशूला पाहण्याच्या उत्कंठेनं झाडावर चढला.
तो तर जकातदार आहे.
-लवकर खाली ये, जक्कय. आज मला तुझ्या घरी राहायचं आहे.
-माझ्या घरी? त्याच्या घरी कोण राहील?
जक्कय कसं काय येशूला ओळखतो?
ऐका!
मी माझ्या मिळकतीतून अर्धी गरिबांना देतो.
आणि मी जर कुणाला फसवलं असेन तर मी त्याला चारपट परत देतो! हंम्म!
माझा विश्वास बसत नाही! एक जकातदार पैसे परत देतो? अशक्य!
खचित आज ह्या घराला तारण प्राप्त झालं आहे.
कारण हा मनुष्यदेखील अब्राहामचा वंशज आहे.
मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे.
ऐका… आपण यरूशलेमला जात आहोत,
जिथे मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांचा प्रत्येक लेख पूर्ण होईल.
-त्याला परराष्ट्रीयांच्या हाती देण्यात येईल.
ते त्याची थट्टा करतील, विटंबना करून त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील
आणि जिवे मारतील.
पण तिसऱ्या दिवशी तो जिवंत उठेल.
येशूनं दृढ निश्चय करून यरूशलेमचा रस्ता धरला.
तो हे जाणून होता की मानवजातीच्या पापांसाठी तो मारला जाईल
आणि तरीही तो पुढे पुढे जात होता.
पुष्कळ लोकांनी त्याच्या येण्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्याला आपला राजा घोषित केलं.
गुरुजी, तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगा की गप्प राहा.
मी सांगतो, ह्यांना गप्प केले तर हे धोंडे आपोआपच ओरडू लागतील.
शांती, कृपा, दया.
येशू येरूशलेमजवळ आला असता त्याकडे पाहून त्याला रडू आलं.
खरं तर… आज तू शांतीच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्या होत्यास पण तू तसं केलं नाहीस.
असे दिवस येणार आहेत की तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील,
तुला वेढतील, चहूकडून कोंडमारा करतील.
आणि ह्याच भिंतीखाली तुझा सर्वनाश करतील.
तुझा आणि तुझ्या लेकरांचा.
आणि ते तुझ्यात दगडावर दगड राहू देणार नाहीत.
कारण तू तुझ्यावरील कृपेला जाणूनच घेतलं नाहीस.
यरूशलेममधलं पवित्र मंदिर भक्तिस्थानाऐवजी बाजारपेठ झालं होतं.
पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा.
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20
-21, 22, 23, 24, 25...
लिहिलं आहे! "माझं घर प्रार्थनेचं घर होईल, पण तुम्ही त्याला लुटारूंची गुहा केली आहे!
तो माझा कळप हाकलतोय. त्याला थांबवा. थांबवा त्याला!
शिपायांना बोलवा, लवकर बोलवा!
काही राजनैतिक आणि धार्मिक पुढाऱ्यांमध्ये येशूबद्दल विरोध वाढू लागला.
कारण त्याला लोक राजा असं घोषित करत होते.
अहो समजलं की पुष्कळ जणांनी त्याला राजा मानलं आहे.
राजा?
भिकारी, वेश्यां आणि चोरांचा राजा!
त्याच्यासारखे खूप पाहिले आहेत. स्वतःला राजा म्हणवणारे येतात आणि जातात.
-लोक त्यांना विसरून जातात.
अंधारात राहू नका.
दिवसेंदिवस त्याचे शिक्षा वाढत आहे.
लोक त्याची प्रशंसा करीत आहेत.
आणि म्हणतात तो राजा आहे!
पाहा, मी तुम्हाला आता बजावतो.
जर ह्या माणसानं शांतता भंग केलीच तर मी तुम्हाला जबाबदार धरीन.
कदाचित ते खरं आहे.
आता गालीलीयांशी झुंज द्यावीच लागेल.
येशूनं आपल्या शिक्षणाद्वारा धर्मगुरूंच्या ढोंगी गटाला उघडकेला आणलं.
त्यामुळे यहूदियात येशूची शिक्षा वाढू लागली.
त्याचबरोबर ढोंगी गटाचा विरोधही वाढू लागला.
मंदिरात येशूनं एका विधवेला दोन तांब्याची नाणी भांडारात टाकताना पाहिलं.
हे फारच कमी आहे.
तू आणखी नाही देऊ शकत?! -मी सांगतो!
ह्या गरीब विधवेनं सर्वात अधिक दान केलं आहे.
ह्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान केलं.
पण हिनं तर इतकी गरीब असताही जीवनाची सर्व कमाईच दान केली आहे.
आम्हाला सांग, कोणत्या अधिकारानं तू हे बोलतोस?
कोणी दिला तुला हा अधिकार?
आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो.
योहानाला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार स्वर्गापासून मिळाला की मनुष्यापासून?
आम्ही काय म्हणावं?
जर आपण देवापासून म्हटलं तर तो म्हणेल,
"योहानावर का विश्वास ठेवला नाही?"
आणि मनुष्यांपासून म्हणावं तर सर्व लोक आम्हाला दगड मारतील.
ते सर्व मानत होते की योहान एक संदेश्टा होता.
आम्ही याविषयी तर जाणतच नाही.
तर कोणाच्या अधिकाराने या गोष्टी करतो ते मी सांगणार नाही.
एकदा एका माणसानं द्राक्षाचा मळा लावला.
तो मळेकरांना सोपवून…
काही वर्षांकरता दूरदेशी गेला.
मग द्राक्षं जमा करायची वेळ आली
तेव्हा त्यानं आपल्या एका दासाला पाठवलं
की द्राक्षांचा आपला हिस्सा घेऊन ये.
पण मळेकरांनी त्याला मारून रिकाम्या हाती पाठवून दिलं.
म्हणून त्यानं दुसऱ्या दासाला पाठवलं,
पण मळेकरांनी त्यालाही मारून त्याचा अपमान करून त्याला रिकाम्या हाती पाठवलं.
पुन्हा धनीनं तिसऱ्या दासाला पाठवलं.
मळेकरांनी त्याला मारहाण करून बाहेर टाकून दिलं.
तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी स्वतःशी म्हणाला, "मी काय करावं?"
मी माझ्या प्रिय पुत्रालाच पाठवतो.
जरूर ते त्याचा मान राखतील.
पण मळेकरांनी पुत्राला येताना पाहिलं आणि आपापसात बोलले,
"याला ठार मारा, म्हणजे वतन आपलं होईल."
प्र भूजी, आणखी सांगा.
त्यांनी त्याला मळ्याबाहेर काढलं
आणि ठार केलं.
तर मग धनी हे सर्व पाहून त्यांना काय करेल, सांगा बरं?
तो मळेकरांचा नाश करून द्राक्षमळा दुसऱ्यांच्या हाती देईल.
या शास्त्रलेखाचा अर्थ काय?
जो दगड बांधणाऱ्यांनी अयोग्य समजून नाकारला,
तोच इतरांहून सर्वश्रेष्ठ ठरला.
जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील.
परंतु ज्याकोणावर तो दगड पडेल त्याचा तो भुगा करून टाकेल.
गुरूजी, आपण जे काही बोलता, शिकवता ते खरं आहे.
आपण तोंडदेखलं बोलत नाही हे आम्ही जाणतो,
तर तुम्ही देवाच्या इच्छेविषयी सत्य शिकवा.
तर सांगा, आम्ही कैसरला कर देणं हे आमच्या नियमाविरुद्ध आहे किंवा नाही?
प्रभूजी, तो आपल्यास फसवू इच्छितो आहे.
मला एक नाणं दाखवा.
-यावरील मुखवटा आणि लेख कोणाचा आहे? -कैसराचा!
तर जे कैसराचं आहे ते कैसराला द्या
आणि जे देवाचं ते सर्व देवाला द्या.
तर तुमचं उत्तर काय?
आता बेखमीर भाकरीचा सण म्हणजे वल्हांडणाचा सण जवळ आला होता.
आणि येशूनं शिमोन, पेत्र आणि योहान
यांना वल्हांडणाच्या भोजनाच्या तयारीसाठी पुढे पाठवलं.
माझी फार इच्छा होती दुःख भोगण्यापूर्वी मी हे वल्हांडण भोजन तुमच्याबरोबर करावं.
मी तुम्हाला सांगतो,
देवाच्या राज्यात ते पूर्ण होईपर्यंत मी भोजन करणारच नाही.
धन्य हो तू हे प्रभू आमच्या देवा, सृष्टीच्या राजा,
जो तू द्राक्षवेलींतून फळ देतोस.
हे घ्या आणि सर्वजण यातून प्या.
मी तुम्हाला सांगतो की देवाचं राज्यपुन्हा येईपर्यंत द्राक्षाचा उपस मी पिणारच नाही.
धन्य हो तू हे प्रभू आमच्या देवा, सृष्टीच्या राजा,
जो या धर्तीतून अन्न उत्पन्न उपजवतोस.
हे माझं शरीर आहे तुम्हांसाठी दिला जात आहे.
माझ्या स्मरणार्थ हे करा.
हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे,
जे तुमच्यासाठी वाहिलं जात आहे.
पण पाहा, माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे.
मनुष्यपुत्राचा मृत्यू तर निश्चित आहे जसं की देवानं योजलं,
-पण हाय त्या मनुष्याला जो त्याचा विश्वासघात करतो. -हे होऊ शकत नाही.
हे नाही होऊ शकत.
हे अशक्य आहे!
सांगा, कोण आहे तो विश्वासघातकी.
तुम्हामध्ये सर्वात मोठा सर्वात लहानांसारखा हो.
आणि पुढारी सेवा करणाऱ्यासारखा असो.
मोठा कोण? भोजनाला बसणारा…
की भोजन वाढणारा?
भोजनाला बसणाराच मोठा असतो.
मी तर तुमच्यामध्ये वाढण्यासारखा आहे.
तुम्ही माझ्या प्रत्येक परीक्षांमध्ये माझ्याबरोबर राहिलात.
जसं माझ्या पित्यानं मला राज्य करण्याचा हक्क दिला आहे
तसं मीही तुम्हाला देतो.
तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावं आणि प्यावं.
आणि राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशांवर राज्य करावं.
-मग विश्वासघातकी नाही. -शिमोन, पाह शिमोन!
सैतानानं तुम्हास सर्वांची परीक्षा घ्यायची ठरवली,
जुळू चांगलं वाईटातून बाजूला करावं जसं शेतकरी भुषातून गहू बाजूला काढतो.
पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली की तुझा विश्वास ढळू नये.
आणि जेव्हा तू माझ्याकडे वळशील तेव्हा आपल्या भावांचा विश्वास दृढ कर.
प्रभुजी… मी आपल्याबरोबर तुरुंगात जायला तयार आहे.
-आणि मरायला… -पेत्र, मी सांगतो.
आज कोमडा बांग देण्यापूर्वी तीन वेळा तू असं म्हणशीलकी मी येशूला ओळखत नाही.
मी तुम्हाला जोडे, पिशवीच, झोळीविना पाठवलं तर काय कमी पडलं?
नाही, काही नाही.
पण आता ज्याच्याजवळ पिशवी आणि झोळी आहे त्यानं ती घ्यावी.
ज्याच्याजवळ तलवार नाही त्यानं वस्त्र विकून ती घ्यावी.
मी सांगतो, शास्त्रात लिहिलंय की त्याची गणना अपराधांत झाली.
जे माझ्याविषयी लिहिलं ते खरं होतं आहे.
पाहा, माझ्याकडे दोन सुरे आहेत प्रभू.
एवढ्या पुरे.
वडील मंडळ येशूचा कसा काटा काढावा याविषयी विचार करण्यासाठी एकत्र जमलं होतं.
मग बारा शिष्यांपैकी यहुदा इस्करयोत याच्यामध्ये सैतान शिरला.
त्यानं येशूला धरून घेण्याची सल्लामसलत वडील मंडळाशी केली.
येशू येरूशलेमहून जैतून डोंगराकडे प्रार्थनेसाठी गेला.
प्रार्थना करा की तुम्ही परिक्षित पडू नये.
यहुदा इस्करयोतनं चांदीच्या फक्त 30 मोहरांसाठी येशूला पकडून दिलं.
मानवाच्या उद्धारासाठी मरण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणून येशूनं प्रार्थना केली.
हे पित्या…
तुझी इच्छा असेल…
तर हा प्याला माझ्यापासून दूर कर.
तरीपण माझ्या इच्छेनं नको… तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
तेव्हा स्वर्गातले देवदूत त्याला सामर्थ्य देताना त्यांना पाहिले.
त्याचा घाम भूमीवर असा पडत होता जसे रक्ताचे मोठे थेंब.
तुम्ही झोपलात काय?
उठा.
परीक्षेत पडू नये प्रार्थना म्हणून करा.
यहूदा!
चुंबन घेऊन मनुष्यपुत्राचा विश्वासघात करतोस?
प्रभुजी, आम्ही तलवार चालवावी का?
ह्याला अटक करा.
-फार झालं.
लुटारूला धरावं, तसं मला धरायला तलवार-सोटी घेऊन आलात का?
मी दररोज तुमच्याबरोबर मंदिरात असे, तेव्हा तुम्ही मला धरलं नाही.
पण ही तुमची कार्यकरणाची वेळ आहे. जेव्हा अंधकाराची शक्ती राज्य करणे.
याला अटक करा!
त्याचा बंदोबस्त ठेव!
शिपायांनी येशूला अंगणात नेलं आणि येहूद्यांचा राजा म्हणून त्याची कुचेष्टा केली.
ह्या राजाची वस्त्र तर पाहा!
सांग आता काय होणार ते.
काय तू आम्हाला वाचवणार महाराज? तू आम्हाला वाचवणार?
-हा मनुष्यदेखील येशूबरोबर होता. -अहो बाई पण मी त्याला ओळखतच नाही.
मी दोघांना एकत्र पाहिलं आहे.
तुझे नम्र सेवक!
दुसऱ्यांकडे पाहताना कसं वाटतं?
-हंम्म. तूही त्यांच्यापैकीच एक आहेस. -पण मी नाही!
ह्यात काही शंकाच नाही हा माणूस येशूबरोबर होता.
कारण हा गालीली पण आहे.
-चाल जाऊ दे. -मला काही समजतच नाही तुम्ही काय बोलताय ते.
मग येशूनं वळून सरळ पेत्राकडे दृष्टि लावली.
तेव्हा प्रभून त्याला जे म्हटलं होतं त्याची आठवण झाली.
आज कोंबडा आरण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.
प्रभू, मी विनंती करतो.
की आपल्या महान दयेनुसार मला क्षमा कर. क्षमा कर.
प्रभू…
आमच्या वाळवंटांनी जेव्हा… तुझ्या नियमांचा विरोध केला
तेव्हा तू त्यांच्यावर क्रोधित झालास, तरी त्यांचा विनाश केला नाही.
हे केवळ तुझ्या महान प्रेम आणि विश्वासूपणामुळे…
तू त्याला वाचवलंस.
मलाही वाचव. मलाही वाचव.
-तुला कोणी मारलं, सांग? -भविष्यवाणी कर, तुला कोण मारणार आहे.
थांबवा!
मी सांगतो थांबवा! न्यायसभेत न्या त्याला.
चल!
येशूच्या चौकशीसाठी एकत्र जमलेल्याधार्मिक पुढाऱ्यांची सभा भरली.
अम्हाला सांग, काय तू मसीहा आहेस?
जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही.
आणि मी प्रश्न केला तर तुम्ही उत्तर देणार नाही.
पण आतापासून मनुष्यपुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल.
तर काय तू देवाचा पुत्र आहेस?
तुम्ही म्हणता मी आहे.
असं म्हणण्याचा अधिकार याला कोणी दिला?
]दोषी!
आपण सर्वांनी आपल्या कानाने ऐकलं ना तो काय म्हणतो ते?
आपण त्याला पिलाताकडे नेऊ.
होय होय त्याला घेऊन जा.
चल!
नंतर त्यांनी येशूला पिलाताकडे नेलं
जो रोमी अधिकारांपैकी सर्वात क्रूर
आणि हजारोंना क्रूसावर चढवायला जबाबदार होता.
एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही सर्व इथे कशाला आलात?
आम्ही त्याला आमच्या लोकांना बघावताना पाहिलंय.
याने ना मंदिराच्या बाजारात खळबळ माजवली.
पण याला शिक्षा काय होणार? शिक्षा द्या.
मला ह्या मनुष्यात काहीही दोष आढळत नाही
आम्हाला तो दोषी आढळाय आहे. कैसरला कर देऊ नका असं लोकांना सांगतो
आणि स्वतःला मसीहा म्हणवतो. एक राजा.
राजा?
तू याहुद्यांचा राजा आहेस काय?
तुम्ही हे म्हणता.
ह्यानं हे सर्व गालीलात सुरू केलं आणि थंय येऊन पोहोचला.
गालिलमध्ये?
हा माणूस गालिलीय आहे काय?
तसं असेल तर आपण ह्याला हेरोदकडे पाठवू.
तो अजूनही यरूशलेममध्येच आहे ना?
त्याला हेरोदकडे न्याया.
तू स्वताला काय समजतोस?
कोण आहेत ते तुझे शिष्य म्हणून घेणारे?
लोक मानतात की तू चमत्कार करतोस म्हणे.
माझ्यासाठी काहीतरी कर.
महाराज, ह्यानं सर्व लोकांना बहकवलं आहे.
हा स्वतःला राजा म्हणून घेतो.
हा मनुष्य? एक राजा?
ओ महाराज!
त्याला चोप द्या!
ह्याला पिलातकडे न्या. हा त्याचा प्रांत आहे.
यानं असं काहीही केलेलं नाही की त्याला मृत्युदंड द्यावा.
म्हणून मी त्याला फटके मारतो आणि मग सोडून देतो.
आमच्यासाठी या सणात एका कैद्याला सोडावं म्हणून तो आमचा ऋणी आहेस.
-आमच्यासाठी बरब्बाला सोडा. -होय.
आणि याला शिक्षा करा.
होय, आम्हाला बरब्बा हवा.
क्रूसावर टांगा त्याला! होय! त्याला क्रूसावर टांगा!
-तू, तू! त्याला फटके मार.
पिलाते! तुम्ही कशाची वाट बघताय?
येशू!
त्याला का इतकं छळता?
त्याला सोडा! तो मसीहा आहे!
त्यानं काही केलं नाही.
त्याला उचला!
ते जोरजोरात बोलत होते की येशूला क्रूसावर चढवा.
तेव्हा पिलातानं येशूला मृत्युदंड जाहीर केला.
खून आणि दंग्यामुळे कैद्येत असलेल्या बरब्बाला
त्यानं लोकांच्या इच्छेनुसार सोडून दिलं.
त्यांची ही मागणी होती.
आणि मग येशूला क्रूसावर चढवण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केलं.
मागे! मागे व्हा! मागे!
बाजूला व्हा!
त्याच्यापासून दूर व्हा!
मागे व्हा! व्हा मागे! मागे! बाजूला!
त्याला सोडा!
बाजूला व्हा!
रस्ता सोड!
-मी सांगतो ना, बाजूला व्हा!
उठ! उठ!
-तू! तुझं नाव काय? -पुऱेनचा शिमोन, महाराज.
तू घेऊन चल!
दोर कापा!
तू! घेऊन चल! चल, निघ!
मागे ये!
मागे! त्याला सोड!
बाजूला व्हा! रस्ता सोडा!
मागे! मागे व्हा!
मागे व्हा!
हे प्रभू, तुझ्यासाठी आम्ही रडतोय.
पी… पी हे प्रभू.
अहो येरुशलेमच्या कन्यांनो. माझ्यासाठी रडू नका.
तर आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी रडा.
कारण हे लोक ओल्या झाडाची ही व्यवस्था करतात आहेत
तर वाढलेल्याची काय दशा करतील?
देव तुला सहाय्य करो. -आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू.
हे! इथे उभा राह! पुढे चाल! लवकर! लवकर!
आता तू जा!
धावत रहा! असाच चाल! लवकर चाल!
लवकर! आता निघ! बाजूला व्हा!
आता तू पुढे हो! चल आता!
आपलं काम करत रहा!
उचला!
जोर खेचून जरा!
तू खुंटी आत ठोक!
दोर सैल करा!
यांना क्षमा कर, पित्या.
त्यांना समजत नाही ते काय करतायत.
त्यानं दुसऱ्याला वाचवलं.
आता त्यानं स्वतःला वाचवावं.
होय! तू जर मसीहा आहेस तर स्वतःला वाचव. आणि क्रूसावरून खाली उतर!
आम्हाला तुझा एखादा चमत्कार दाखव!
कित्येक वर्षांपूर्वी देवाच्या संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली होती
तिची परिपूर्णता म्हणून येशूला दोन चोरांच्या मध्ये टांगलं गेलं.
ही कोण साधारण माणसाची वस्त्रं नाहीत…
अरे, राहू दे! फाडू नकोस! मी तुला सांगतो त्याचं काय करायचंय.
चला, चिठ्ठ्या टाकूया. या!
तू नशीबवान आहेस. आता तू त्याचं काय करणार हा?
त्याच्या डोक्यावर एक पाटी लावली होती ज्याच्यावर लिहिलं होतं
"हा येहुद्यांचा राजा आहे."
तू जर येहुद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचो!
काय? तू… मसीहा आहेस ना?
तर…
स्वतःला…
आणि आम्हालापण वाचव.
तुला देवाची भय नाही काय?
त्याला तीच शिक्षा मिळाली…
जी आम्हाला मिळाली.
पण त्यानं काहीही गुन्हा केला नाही.
माझी आठवण ठेवा, येशू, जेव्हा आपण राजा बनून याल.
मी वचन देतो…
तू आज माझ्याबरोबर स्वर्गात…
असशील.
आता मध्यान्ह होत होते आणि सर्व देशात तीन वाजेपर्यंत अंधुक्कार पसरला.
मंदिरातला पडदा वरपासून खालपर्यंत मधोमध फाटला.
हे पित्या…
मी माझा आत्मा…
तुझ्या हातात… सोपवतो.
शिपायांच्या सरदारानं हे सर्व पाहिलं आणि त्यामुळे देवाचा गौरव करत तो म्हणाला,
देवाचा गौरव असो. खरंखरं हा मनुष्य नीतिमान होता.
धर्मसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य अरिमथायातला योसेफ जो या कृत्येशी सहमत नव्हता
त्यानं जाऊन पंतपिलाताची परवानगी मागितली
की सूर्यास्तापूर्वी म्हणजे विश्रांती दिवस सुरू होण्याआधी
येशूचं देह एका कबरीत ठेवावा.
आम्हाला क्षमा असावी… आम्ही प्रभूच्या शरीरामागे आलो.
सर्व येऊ शकता. पण चला, विश्राम दिवस सुरू होत आहे.
रविवारी भल्या पहाटे काही स्त्रिया त्यांनी बनवलेलं सुगंधी द्रव्य घेऊन कबरेकडे आल्या.
कबरेवरचा दगड बाजूला ढकललेला त्यांनी पाहिला.
त्या आत गेल्या तर येशूचा देह तिथे नव्हता.
तुम्ही जिवंताचा शोध मेलेनांमध्ये का करतात?
तो इथे नाही तर उठला आहे. आठवण करा, गालिलात त्याने तुम्हाला काय सांगितलं?
मनुष्याच्या पुत्राला पापी जाणार करे सोपवण्यात यावं,
क्रूसावर मारण्यात यावं पण तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठेल.
ऐका! दोंड बाजूला लोटली होती.
आम्ही आत गेलो तर येशूचं शरीर तिथे…
नव्हतं.
प्रभूचा देह गायब? -आणि दोन माणसं आभारा दिसली.
स्वर्गदूत समकताना सूर्यसमान.
आणि आम्हाला म्हणलं तुम्ही जिवंताला मृतामध्ये का शोधता?
हे खरं आहे.
विश्वास करा, विश्वास.
आम्ही त्याला पाहिलं, तुम्हीही जाऊन पाहा. कबर रिकामी होती
आणि प्रभू तिथे नव्हता.
पेत्रा, आमच्यावर विश्वास ठेव.
येशूने दोन शिष्यांना दर्शन दिलं. ते उत्साहानं इतर शिष्यांकडे परतले.
खरोखर प्रभू जिवंत झाला! तो शिमोनाला दिसला!
आम्ही त्याला रस्त्यावर पाहिलं
-तर ओळखलंच नाही. -जेव्हा त्याने भाकर मोडली तेव्हाच आम्ही ओळखलं.
एम्माउसला? आश्चर्य! तो तिथे पोहोचला?
तुम्हाला शांती असो.
तुम्ही का घाबरलात?
तुमच्या मनात शंका का येतात?
पाहा, माझे हात आणि पाय. आणि जाणा की मीच आहे.
मला स्पर्श कराल तर ओळखाल.
कारण आत्म्याला हाडमांस नसतं जसं तुम्ही माझ्या हात पाहता.
मी तुमच्याबरोबर होतो तेव्हा तुम्हाला हेच सांगत होतो.
माझ्याविषयी मोशेचे नियम स्टोत्रे आणि संदेश जे शास्त्रात जे लिहिले होते ते सर्व पूर्ण होणं आहे.
हेच तर लिहिलं आहे.
ख्रिस्ताने दुःख सहसावं, तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत व्हावं
आणि येरूशलेमपासून आरंभ करून
सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप आणि पापक्षमेचा संदेश घोषित करण्यात यावा.
तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात
आणि माझ्या पितानं देऊ केलेली देणगी मी स्वतः तुमाकडे पाठवतो.
तोपर्यंत येरूशलेममध्येच राहा
जोपर्यंत स्वर्गातचा सामर्थ्य तुमच्यावर येत नाही.
प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो आणि सांभाळो.
स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.
तेव्हा जाऊन सर्व राष्ट्रातल्या लोकांना शिष्य करा
त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या.
जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलं ते सर्व त्यांना पाळवया शिकवा.
आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वकाळ तुमच्याबरोबर आहे.
आमेन.
फार आधी संदेष्ट्यांनी वचनांत लिहिलं होतं.
की परमेश्वर पापी लोकांना वाचवण्यासाठी मसिहाला पाठवील आणि त्याचं समेट आपल्या सोबत करील.
येशूचं जीवन हे दाखवतं की हा तारणारा आहे.
यशयाच्या संदेष्ट्या लिहितो कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि ते घडलं.
परमेश्वराचं सामर्थ्य मर्य्यावर येऊन कुमारी असतानाही ती गर्भवती झाली
आणि तिनं येशूला जन्म दिला.
जसं की हे वचनात लिहिलेलं आहे हा चमत्कार आहे.
त्याचा जन्म हे देवाचं चिन्ह आहे की हा पुत्र मसिहा आहे ज्याला देवानं आपल्या पुत्र असं म्हटलं.
जेव्हा लोकांनी येशूला पाहिलं त्यानं देवाचं सामर्थ्य आणि स्वभाव पाहिला.
त्यानं लोकांना आरोग्य दिलं आणि त्याच्या पापाची क्षमा केली.
आणि त्यानं त्यांना अनंतकाळच्या राज्याचा अभिवचन दिलं.
येशूनं आपल्या प्राणांचं बलिदान केलं आणि सर्व मानवजातीकरिता शिक्षा भोगली.
नंतर तो परत जिवंत झाला आणि हे दाखवून दिलं की त्याचं सामर्थ्य हे मृत्यूच्या सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
येशू ख्रिस्तानं म्हटलं माझ्याकडे जीवन देण्याचं आणि ते परत घेण्याचं सामर्थ्य आहे.
ज्या प्रकारे संदेश त्यांनी लिहिला होता की मसिहाचा जीवन कशा प्रकारचा असेल,
त्याचं जीवन तसंच होतं.
येशूचं जीवन ह्याची खात्री देतं की देवाचं पवित्र वचन हे सत्य आणि न बदलणारं आहे.
खरंच येशू हा देवाचं वचन होता.
येशूद्वारे देवाने स्वतःहाच या जगातील लोकांना प्रकट केलं.
प्रारंभी परमेश्वरानं पुरुष आणि स्त्रीची रचना केली,
जेणेकरून ते त्याच्या उपस्थितीत आरामदायक राहावेत.
परंतु त्यांनी परमेश्वरावर अविश्वास दाखविला आणि त्यांनी त्याच्या आज्ञा मोडली.
वचनात हे लिहिलं आहे की सर्व मानवजातीनं पाप केलं आहे
आणि पापांचा परिणाम मृत्यू आहे.
ज्या लोकांनी पाप केलं ते देवासोबत राहू शकत नाहीत.
ज्या प्रकारे परमेश्वरानं अब्राहमाच्या मुलाऐवजी एळका मरण्यास पुरविला,
त्याप्रकारे परमेश्वरानं आदामाच्या वंशाच्या ऐवजी येशूला मरण्यास पाठवलं.
हे त्यांनी अशासाठी केलं की जो कोणी येशूवर विश्वास आणि भरवसा ठेवील
तो परमेश्वराच्या उपस्थितीत येईल.
म्हणून जो कोणी येशूच्या मागे चालेल तो शिक्षेपासून वाचविला जाईल
आणि परमेश्वरासोबत सदा सर्वकाळ राहील.
जेव्हा येशू मृतांतून जिवंत झाला, आपल्या मागे चालणाऱ्यांना त्यानं म्हटलं,
लोक माझं नाव सर्व राष्ट्रात जाहीर करतील,
जेणेकरून जो पश्चात्ताप करील आणि माझ्याकडे येईल परमेश्वर त्याच्या पापांची क्षमा करील.
येशूनं हे देखील म्हटलं की तो पवित्र आत्मा पाठवेल
जो त्याच्या मागे चालणाऱ्यांसोबत राहील जो त्यांना सत्य दाखवील
आणि परमेश्वराच्या मार्गावर चालण्याकरिता सामर्थ्य देईल.
जेव्हा पापी स्त्रीनं आपल्या पापांचा पश्चात्ताप केला आणि येशूच्या मागे चालू लागली
येशूनं तिला म्हटलं, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
तुझ्या विश्वासाने तुला वाचवलं आहे."
येशू ख्रिस्तानं लोकांना आपल्या मागे चालण्यास सांगितलं.
ज्यांनी येशूच्या मागे चालण्याचा निर्णय घेतला आहे
ते या शब्दांनी या नात्याची सुरुवात करू शकतात.
पित्या परमेश्वरा, तू नीतिमानआहेस.
मी तुझे आभार मानतो की तू माझ्यावर प्रीती करतोस.
मला खेद वाटतो की तुझ्या आज्ञा मी मोडल्या आणि तुझ्याविरुद्ध पाप केलं.
मी तुझे आभार मानतो की माझ्या ऐवजी तू येशूला मरण्यासाठी पाठवला
आणि तो मृतातून जिवंत झाला.
मी तुझे आभार मानतो की जे पाप मी केलं होतं त्याची शिक्षा येशूनं स्वतःवर घेतली.
आणि माझा प्रभू म्हणून स्वीकारतो.
मी तुझे आभार मानतो की तू माझ्या पापांची क्षमा केलीस.
आणि मला तुझ्यासोबत राहण्याकरिता तुझ्या राज्यात मार्ग उघडे केलेस.
मी तुला विनंती करतो तुझ्या पवित्र आत्म्याकरिता जो माझ्यासोबत राहील
आणि मला तुझा मार्ग दाखवेल.
तू मला सामर्थ्य देशील की मी तुला संपूर्ण अंतःकरणानं प्रीती करावी
आणि तुला आवडणारा जीवन मी जगावं
आणि जगात लोकांन प्रत्येक ठिकाणी तूची स्तुती करावी. आमेन.
येशूनं आपल्या मागे चालणाऱ्यांना म्हटलं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात.
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात.
येशूच्या मागे चालणारे एकत्र भेटले,
ते त्याच्या सोबत रोज बोलले,
ते वचनात त्याच्या शब्दांचा अभ्यास करू लागले.
त्याच्या प्रमाणे चालण्यास ते शिकत आणि त्याच्या बद्दल ते इतरांना सांगत असत.
येशू त्यांना पवित्र आत्म्याने जो त्यांच्या अंतःकरणात राहात असेल
त्याद्वारे मार्गदर्शन आणि सामर्थ्य देत असे.
आपल्या सिंहासनाकडे जे स्वर्गात होते
तिथे जात असताना येशून त्यांना काय म्हटलं ते त्यांनी ध्यानात ठेवलं.
परमेश्वराने स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत
आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.