New Believer Course·10 पैकी 10

The church is everyone who belongs to Jesus. The church allows us to be dependent on God and on each other.

तुमचा प्रश्न विचारा

बायबलमधील उद्धरणे

शेअर करा
1 Corinthians 12:27

Now you are the body of Christ, and each of you is a member of it.

Berean Standard Bible

Public Domain

अधिक वाचा...
मोफत संसाधने

बायबल अधिक सखोल समजून घ्यायचे आहे का?

आमच्या बायबल अभ्यासात सहभागी व्हा

प्रतिलेख

Marathi (मराठी)
चर्च म्हणजे काय? आणि ते इतके महत्त्वाचे का आहे? असे मानले जात असले कि चर्च हे लोक भेटण्याचे ठिकाण आहे तरी, देव म्हणतो चर्च म्हणजे ती प्रत्येक व्यक्ती आहे, जी येशूची आहे. देवाने आपल्याला तारण दिले आहे आपण स्वतंत्र होण्यासाठी नव्हे, पण त्याच्यावर आणि त्याच्यावर प्रीती करणाऱ्या इतरांवर अवलंबून राहण्यासाठी. देवाची लालसा आहे की आपण एकमेकांचे शुद्ध सेवक बनावे, एका विशेष समुदायात जो त्याच्यावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रीती करतो. त्याचे चर्च म्हणून, आपल्याला त्याच्या आत्म्याद्वारे व वचनाद्वारे शिकवले जाते की, एकमेकांवर कशी प्रीती करावी आणि एकमेकांना सहाय्य कसे करावे. आणि जेव्हा आपण सतत एकत्र भेटतो, बायबलचा अभ्यास करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, आणि देवाची उपासना करण्यासाठी, तेव्हा आपण एकमेकांना वाढण्यास आणि भरभराट होण्यास मदत करतो, आनंदाच्या प्रसंगी, आणि दु:खाच्या प्रसंगी ही. देवाचे कुटुंब या नात्याने एकत्र राहण्याद्वारे, आपण अशा इतर लोकांना भेटतो ज्यांना आपण आपली समस्या सांगू शकतो, आणि जे आपल्याला देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. याद्वारे आपल्याला जगाला येशूचा चांगुलपणा, न्याय, क्षमा आणि प्रीतीबद्दल आत्मविश्वासाने सांगण्यास आवश्यक असलेले सहाय्य प्राप्त होते. अशाप्रकारे, देवाने आपल्यासाठी योजलेल्या जीवनाचा चर्च हा एक आवश्यक आणि अद्भुत भाग आहे.
JesusFilm